Serum institute fire: अकोला: पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या भीषण आगीत अकोल्यातील युवकाचा मृत्यू




भारतीय अलंकार24

अकोला : देशभरात कोरोना लस पुरविणाऱ्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये लागलेल्या भीषण आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक मृतक अकोला जिल्ह्यातील चांदूर येथील ३० वर्षीय युवक आहे. महेंद्र प्रकाश इंगळे असे या मृतक युवकाचे नाव आहे. 


आज त्याचा मृतदेह चांदूर येथे येणार असून, अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती इंगळे कुटूबियांनी दिली.


कोरोना लस निर्माण करणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला काल गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. ज्या ठिकाणी बीसीजी लस तयार केली जाते त्या विभागात ही आग लागली होती. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या लागल्या.   


दरम्यान, आगीत कोरोना लस प्लांट सुरक्षित असला तरी इमारतीत अडकलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मूतकांमध्ये अकोल्यातील महेंद्र इंगळे या युवकाचा समावेश आहे. याबाबतची माहिती मृतक महेंद्रच्या कुटुबियांनी दिली आहे. 


महेंद्र हा पुण्यातीलच दुसऱ्या एका कंपनीत कामाला होता. तेथून तो सर्व्हिस देण्यासाठी सिरम कंपनीत आला होता. याचवेळी तो आगीच्या भक्षस्थानी सापडला. यातच त्याचा करून अंत झाला. त्याचा मृतदेह पुण्याहुन अकोल्याला आणण्यात येत असून, आज शुक्रवारी त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती इंगळे कुटुंबीयांनी दिली.



महेंद्रची पार्श्वभूमी


महेंद्र हा पुण्यात Pronak इलेक्ट्रॉमेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. याच कंपनीत त्याला चार वर्ष पूर्ण झाले होते. काल सिरम येथे तो बॅटरीच्या मेंटनन्स साठी गेला होता. या आगीत त्याचा दुर्दैवाने होरपळून मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गावात शोककळा पसरली. त्याच्या लग्नाला दीड वर्ष झाले असून, पत्नी, आई,वडील असा त्याच्या मागे परिवार आहे. महेंद्रचे वडील शेतकरी आहेत. मितभाषी महेंद्रचे दहावी पर्यंतचे शिक्षण अकोल्यात झाले. त्यानंतर वाशिम आणि इंजिनअरिंगचे उच्च शिक्षण नागपूर येथे पूर्ण केले होते.


महेंद्र अनंतात विलीन

दुपारी दोन-अडीच वाजताच्या सुमारास महेंद्रवर त्याच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.







टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा