Makar sankrant: मकर संक्रांती निमित्त 'बेटी बचाव - बेटी पढाव' अभियान अंतर्गत चर्मकार समाजाचा महिला मेळावा




भारतीय अलंकार

अकोला: राष्ट्रीय चर्मकार महासंघ  राष्ट्रीय नेते बबनराव घोलप यांनी २ जानेवारी रोजी नाशिक येथे अकोला जिल्हा अध्यक्षपद रिक्त जागी जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रविण चोपडे यांना नियुक्ती पत्र  देवून त्यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती विदर्भ अध्यक्ष गजानन भटकर यांनी दिली.तसेच मकर संक्रांती निमित्त बेटी बचाव - बेटी पढाव अभियाना अंतर्गत महिला मेळावा, संत रविदास महाराज जयंती व महिला मेळावा तसेच नवनिर्वाचीत पदाधिकारी यांचा सत्कार २८ फेब्रुवारी रोजी घेण्याचे ठरले असल्याचेही भटकर यांनी सांगितले. 


हॉटेल जसनागरा येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत भटकर बोलत होते.



राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही संघटना सर्वात मोठी संघटना असून, ही अराजकीय संघटना आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे २४ सप्टेंबर १९९५ मध्ये  बबनराव घोलप यांच्या नेतृत्वामध्ये या संघटनेची स्थापना झाली आहे. या संघटनेचे ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत संघटनेचे विचार, संघटनात्मक कार्यक्रम करण्यात येऊन समाजाची बांधणी करण्यात आली व आज या संघटनेचे रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे. 




राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वाकडून आलेल्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम त्यामध्ये सामाजिक उपक्रम, संत रविदास महाराज जयंती तसेच संत रविदास महाराज पुण्यतीथी, गुणवंत विद्याथ्यांचा सत्कार, सुशिक्षीत बेरोजगारांना मार्गदर्शन, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, मकरसंक्रांती निमित्त बेटी बचाव-बेटी पढाव अभियान अंतर्गत महिला मेळावा, उपवर-वधू परिचय मेळावा, उपवर-वधू परिचय पुस्तिकेचे प्रकाशन असे अनेक सामाजिक

उपक्रम राबविले जातात,असे देखील भटकर यांनी सांगितले.




समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार विरोधात समाजाला न्याय मिळवून देण्याकरीता संघटना काम करते. दरवर्षी प्रमाणे मकर संक्रांती निमित्त बेटी बचाव - बेटी पढाव अभियाना अंतर्गत महिला मेळावा, संत रविदास महाराज जयंती व महिला मेळावा तसेच नवनिर्वाचीत पदाधिकारी यांचा सत्कार २८ फेब्रुवारी रोजी घेण्याचे ठरले आहे. 




या कार्यक्रमाला समाजाचे क्रांतीकारी नेते .बबनराव घोलप (माजी सामाजिक न्यायमंत्री,म.रा.)  हे उद्घाटक म्हणून लाभणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहणे म्हणून अभिनेत्री, किन्नर,सामाजिक नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहीती आज विदर्भ अध्यक्ष  गजानन भटकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघ (म.रा.) यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेला उपस्थित पदाधिकारी गजानन भटकर विदर्भ अध्यक्ष, रामाभाऊ उंबरकर प.विदर्भ युवा प्रमुख, आशा चंदन महिला प्रदेश उपाध्यक्षा, प्रविण चोपडे जिल्हाध्यक्ष, सुनिल झेड गवई जिल्हा महासचिव, शिवलाल इंगळे महानगर अध्यक्ष, प्रतिभा शिरभाते महिला जिल्हाध्यक्षा, छाया इंगळे महानगर जिल्हाध्यक्षा,पांडूरंग वाडेकर जेष्ठ नागरिक अध्यक्ष, सुमित पानझाडे महानगर युवा अध्यक्ष, किशोर काकडे अकोला तालुकाध्यक्ष, नागोराव ठोसर तेल्हारा तालुकाध्यक्ष, रवी मालखेडे अकोट तालुकाध्यक्ष, भोनाजी ठोंबरे बाळापूर तालुकाध्यक्ष, छगन पुरुषोत्तम पातूर तालुकाध्यक्ष, रामकृष्ण शेगोकार, संदिप कदम बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष, संतोष इंगळे महानगर उपाध्यक्ष, शांता वाडेकर महानगर महीला उपाध्यक्षा, संज्योती मांगे , राज्य कार्यकारीणी सदस्य. के.टी. पद्मणे, ताजणे साहेब, योगेश इंगळे, छोटु डांगे, दिनेश डिडुले, गजानन उंबरकार, अजय पद्मणे, अशोक पद्मणे, आकाश टाले आदी उपस्थित होते.

टिप्पण्या