Election: ग्रामपंचायत निवडणूक:मतदान व मतमोजणी दिनी आठवडी बाजार राहणार बंद

                                       file photo


भारतीय अलंकार

अकोला: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ करिता शुक्रवार १५ जानेवारी  रोजी मतदान होणार असून सोमवार १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन्ही दिवशी निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत.


जिल्हाधिकारी यांचे आदेश


जिल्ह्यातील ज्या गावातील निवडणूक क्षेत्रात मतदानाचे दिवशी म्हणजेच शुक्रवार १५ ,जानेवारी रोजी  व मतमोजणीचे दिवशी सोमवार १८ जानेवारी रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा  दंडाधिकारी जितेंद्र  पापळकर यांनी दिले आहेत.



आणखी असेही आदेश पारीत करण्यात येत आहे की, वर नमुद  ठिकाणांचे आठवडी बाजार दुस-या दिवशी भरविण्यात यावेत.

टिप्पण्या