Crime news: डेटिंग ऍपवर महिलेशी मैत्री करणे तरुणाला पडले महागात…



पुणे: अलीकडे ऑनलाईन फ्रेंडशिप करण्याकडे  फारच कल वाढला आहे. यातून अनेक नवे गुन्ह्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार पुण्यात घडला. डेटिंग ऍपवरून महिलेशी मैत्री करणे एका तरुणाला महागात पडले आहे. या महिलेने तरुणाला पुण्यात भेटायला बोलावले. एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याच्याकडील दागिने, रोकड आणि मोबाइल फोन लुटला.


पुण्यातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला नुकताच उघडकीस आला आहे. घटनेची हकीकत थोडक्यात अशी की, ऑनलाइन डेटिंग ऍप वर चेन्नईतील तीस वर्षीय आशिषकुमारची महिलेसोबत मैत्री झाली. तिने त्याला पुण्याला भेटायला बोलावले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये ते दोघे गेले. तेथे गेल्यानंतर महिलेने शीतपेयात गुंगीचे औषध मिसळले आणि त्याला प्यायला देवून बेशुद्ध केले. यानंतर तिने त्याच्याकडील सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाइल फोन असा एकूण दीड लाखांचा ऐवज लुटला.


तपास सुरू

आशिषकुमार याने या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात महिले विरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषकुमार आणि आरोपी महिलेची डेटिंग ऍप वर ओळख झाली होती. दोघेही एकमेकांशी दररोज चॅटिंग करत होते. कामाची गरज असल्याचे सांगत महिलेने त्याला पुण्याला बोलावून घेतले. दोघांनी पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये खोली घेतली. 


१८ जानेवारीला पहाटे पाचच्या सुमारास महिलेने आशिषकुमार याला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि त्याच्या अंगावरील सोन्याची चेन, अंगठी, मोबाइल फोन आणि १५ हजार रुपये असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनंतर शुद्धीवर आलेल्या आशिषकुमार याने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी महिला एका cctv कॅमेऱ्यात कैद झाली आहे, हा धागा पकडून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. 

टिप्पण्या