corona update: अकोला: आज १८ पॉझिटीव्ह

            *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. २८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ३२१*  
*पॉझिटीव्ह-१८*
*निगेटीव्ह-३०३*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड येथील दोन, तर उर्वरित मुर्तीजापूर, कापसी रोड ता.पातूर, खेडकर नगर, अकोट फैल, राजपूतपुरा, जीएमसी, राऊतवाडी, रामदासपेठ, शिवाजी नगर, जठारपेठ, शिवार, राजखेड, संतोष नगर, अन्वी ता. मुर्तिजापूर, जूने शहर व पारस येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९२६३+२०३१+१७७=११४७१* 
*मयत-३३५*
*डिस्चार्ज-१०४७८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६५८*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या