corona update: अकोला: आज ३१ पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. २० जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-४१३*  
*पॉझिटीव्ह-३१*
*निगेटीव्ह-३८२*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व २२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील राम नगर येथील सात,  मलकापूर, रणपिसे नगर व केशव  नगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, गोरक्षण रोड, गणेश नगर येथील प्रत्येकी दोन उर्वरित देवगाव ता. पातूर, उत्तम प्लॉट, बिसेन लेआऊट, रतनलाल प्लॉट, विरला, न्यू तापडीया नगर, केळीवेळी ता. अकोट, मोहम्मद अली चौक, कौलखेड येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९०५६+२००१+१७७=११२३४* 
*मयत-३२९*
*डिस्चार्ज-१०२७३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६३२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या