corona update: आज दिवसभरात ३२ पॉझिटीव्ह; १ मयत

           *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. १९ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३७६*  
*पॉझिटीव्ह-३२*
*निगेटीव्ह-३४४*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात  एक महिला व दोन पुरुषांचा समावेश असून दोन  सिंधी कॅम्प तर एक खडकी येथील रहिवासी आहे. 


दरम्यान आज खाजगी हॉस्पिटल येथून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण डाबकी रोड, अकोला येथील ६५ वर्षीय महिलाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना ८ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १०,  आयकॉन हॉस्पिटल येथून सात, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशन येथून ११ अशा एकूण ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९०२५+१९९९+१७७=११२०१* 
*मयत-३२९*
*डिस्चार्ज-१०२७३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५९९*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या