corona update: अकोला: आज १७ पॉझिटीव्ह; १ मृत्यू

              *कोरोना अलर्ट*


*आज शुक्रवार दि. १ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-२६९*  
*पॉझिटीव्ह-१७*
*निगेटीव्ह-२५२*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट, न्यु खेतान नगर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कमल सोसायटी, कौलखेड, बार्शिटाकळी, कैलास नगर, कुटसा ता.अकोट, जोगलेश्वर, तारफैल, राऊतवाडी, मनकर्णा प्लॉट, खडकी व अकोला फैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण अकोट येथील ७७ वर्षीय पुरुष असून तो दि. १९ डिसेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८४४२+१८८७+१७७=१०५०६*
*मयत-३२३*
*डिस्चार्ज-९७४७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४३६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या