corona update: Akola: आज दिवसभरात ४२ पॉझिटीव्ह

               *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. २८ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३८७*  
*पॉझिटीव्ह-४२*
*निगेटीव्ह-३४५*


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  २४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट व न्यु तापडीया नगर येथील प्रत्येकी तीन, हिवरखेड, गोकुल कॉलनी व सरस्वती इंजी. स्कूल केशव नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित गोरक्षण रोड, शास्त्री नगर, दहिगाव गांवडे ता.अकोट, केशव नगर, कौलखेड, जूने शहर, राजपूतपुरा, बंजारा कॉलनी, रणपिसे नगर, टेलीफोन कॉलनी, सहकार नगर व बलवंत कॉलनी येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे.  


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, हॉटेल स्कायलार्क येथून सात, बिहाडे हॉस्पीटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशन येथून १०, अशा एकूण ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९२८७+२०३१+१७७=११४९५*
*मयत-३३५*
*डिस्चार्ज-१०५१०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६५०*


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या