Akola Police:सावधान:अनोळखी फोन कॉल आणि मेसेजला प्रतिसाद देवू नका; मोफत क्रेडिट कार्ड आणि कॅशबॅकची लालच दोघांना पडली महागात

                                 प्रातिनिधिक चित्र



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: इंटरनेटच्या वापरामुळे आजकाल सर्वच व्यवहार ऑनलाईन होत आहे. बँकिंग क्षेत्रातील व्यवहार सुध्दा ऑनलाईन होत आहेत.परंतू,बँकीग व्यवहार करतांना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. कारण  नागरिकांची अश्या व्यवहारांमध्ये फसवणुक होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाईन फसवणुकीचे असेच दोन प्रकरण अकोल्यात उघडकीस आले आहे. अकोला सायबर पोलिसांनी २४ तासांचे आत तक्रारदारांची ऑनलाईन फसवणुकीत गेलेली ३७,३०० रुपयांची रक्कम परत मिळवून देत,यशस्वी कामगिरी बजावली आहे.


पहिली घटना: मोफत क्रेडिट कार्ड


तक्रारदार अंकुश गजानन गावंडे (रा. सांगवी खुर्द,ता.जिल्हा अकोला) यांनी  ३० जानेवारी रोजी सायबर पोलीस स्टेशन अकोला येथे तक्रार दिली की, त्यांना सकाळी ११ वाजे दरम्यान एक अनोळखी नंबर वरून फोन आला की, त्याला मोफत मध्ये बजाज फायनान्स क्रेडिट कार्ड मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला मोबाईल मध्ये Quick Supports नावाचे अप्लीकेशन डाउनलोड करावे लागणार व त्यानंतर तुमच्या ATM मधुन बजाज फायनन्सच्या अकाउन्ट मध्ये ५ रुपये टाकावे लागणार तक्रारदार यांनी सांगितलेले अप्लीकेशन डाउनलोड केले व बजाज फायनान्सच्या अकाउन्ट मध्ये पैसे टाकले असता, त्याचे अकाउन्ट मधुन ३५,०००/- रू ऐवढी रक्कम कमी झाली.


दुसरी घटना: कॅशबॅक ऑफर


तक्रारदार विपुल पाठक (रा. डाबकी रोड अकोला) यांनी ०६ जानेवारी रोजी सायबर पोलीस स्टेशन अकोला येथे तक्रार दिली की, त्यांना एक अनोळखी नंबर वरून फोन आला की, त्यांना Paytm या ऑनलाईन पोर्टल वर 4000/- रु. कॅशबॅक आले आहे. त्याकरिता तुमचे Paytm अकाउन्ट वर आलेल्या लिंक वर क्लीक करून तुमचा पासवर्ड टाका, असे सांगितले. त्यावरून तक्रारदार यांनी लिंकवर क्लीक करून पासवर्ड टाकला. यानंतर काही वेळातच त्यांच्या अकाउन्ट मधुन ३०,०००/- रू एवढी रक्कम कमी झाली. 


दोन्ही तक्रारी वरून सायबर पोलिसांनी तक्रारदारांचे बँक स्टेटमेंटचे अवलोकन केले. ही रक्कम वेगवेगळ्या टप्प्यात Aeronpay a Paytm ला वळती झाल्याचे लक्षात आले. यानंतर सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ Aeronpay व Paytm कंपनी बरोबर संपर्क करून, सदर प्रकाराबाबतची माहिती देवुन रक्कम तक्रारदारास परत करण्याबाबत कळविले. Aeronpay a Paytm यांनी तक्रारदारास त्यांचे बैंक खात्यामध्ये ७ ते २१ दिवसात जमा होणार असे बोलले.


ही कार्यवाही ही जिल्हा पेलीस अधीक्षक  जी.श्रीधर यांचे मार्गदर्शनात सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके यांच्या नेतृत्वात अतुल अजने, गोपाल ठोंबरे, अशि आमले,राहुल देवीकर यांनी केली आहे


जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे नागरिकांना आवाहन 


सध्या धावपळीच्या काळात आपण बरेच आर्थिक व्यवहार हे इंटरनेटच्या माध्यमातुन करीत असतो. परंतू आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. आपल्या बँक अकाउंट व एटीएमची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला न सांगता नागरीकांनी इंटरनेटचा वापर करतांना अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईन व्यवहार करावा.



बनावट ग्राहक सेवा केंद्रापासून सावधान

                                प्रातिनिधिक चित्र

अलीकडच्या काळात फसवणुकीचे प्रकारांमध्ये वाढ झाली असून बरेच प्रकरणांमध्ये नागरिकांची फसवणुक ही बनावट ग्राहक सेवा केंद्र (हॅशटॅग #Costomer Care) फोन कॉल पासुन फसवणुक झालेली आहे. नागरिकांनी गुगलवर कोणतेही ग्राहक सेवा क्रमांक शोधतांना सतर्क असणे आवश्यक आहे.


कोणतेही ग्राहक सेवा केंद्र प्रतिनीधी आपल्या मोबाईल मध्ये Any Desk , Quick Suports आदी ऍप डाउनलोड करायला सांगत नाही, अश्या प्रकारच्या ऍप्लीकेशनमुळे समोरच्या व्यक्तीला आपल्या मोबाईलमध्ये शिरण्याचा मार्ग मिळु शकतो, त्याकरिता नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क असणे आवश्यक आहे.


टिप्पण्या