Akola Police: शहर वाहतूक अमलदाराने विधीज्ञाचा हरविलेला महागडा मोबाईल केला परत



भारतीय अलंकार

अकोला:  शहर वाहतूक शाखेचे अमलदार यांना मोबाइल सापडला. सापडलेला मोबाईल एका वकिलाचा असल्याचे पोलिसांना कळले. वकिलांना बोलावून महागडा मोबाईल परत करीत पोलिसांनी आपल्या कर्तव्यसह माणुसकी देखील जपली.



पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अकोला दौऱ्या निमित्ताने शहर वाहतूक शाखेने चोख बंदोबस्त लावला होता. सिव्हील लाईन चौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दीपक सोनकर व विजय अदापुरे हे कर्त्याव्यावर हजर असतांना, त्यांना एक महागडा मोबाईल रस्त्यावर पडलेला दिसला. त्यांनी मोबाईल ताब्यात घेतला असता तो स्क्रीन लॉक असल्याचे आढळले. तेवढ्यात त्या मोबाईलवर फोन आला असता, फोन कर्त्याने सांगितले की," तो मोबाईल त्यांचा असून त्यांनी स्वतः चा परिचय ॲड. रितेश अग्रवाल (रा गोरक्षण रोड अकोला) असे असून ते संध्याकाळी सिव्हिल लाईन चौकातून जात असतांना तो खिशातून खाली पडला पण त्यांचे लक्षात आले नाही, घरी गेल्या नंतर मोबाईल आढळून न आल्याने त्यांनी मोबाईलवर फोन केला असता, शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मोबाईल त्यांचे कडे सुरक्षित असून येऊन मोबाईल घेऊन जाण्यास सांगितले.



रितेश अग्रवाल यांनी सिव्हिल लाईन चौकात पोहचून शहर वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक सोनकर व पोलीस अंमलदार विजय अदापुरे यांच्या कडून मोबाईल प्राप्त केला. याबद्दल पोलीस अंमलदार यांचे आभार मानले.शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी सातत्याने कर्तव्य बजावत असतांना नागरिकांचे हरविलेले पाकीट, मोबाईल, महत्वाचे कागदपत्रे वेळोवेळी परत करून एक विश्वास संपादन केला आहे.

टिप्पण्या