Youth festival: जिल्हास्तरीय युवा महोत्सव: स्मृति धूत, सुमित वासनकर, मंदार चतरकर विजेते




भारतीय अलंकार

अकोला : शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाचा उपक्रम असलेल्या जिल्हास्तरीय युवा महोस्तव आज ऑनलाईन पद्धतीने पार पडला.  यावेळी जिल्ह्यातून वक्तृत्व स्पर्धेत स्मृति धूत, बासरी वादनात सुमित वासनकर तर गिटार वादनात मंदार चतरकर हे स्पर्धक विजेते ठरले, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी दिली.



जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेनऊ वाजेपासून या उपक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले. त्यात परिक्षक म्हणून प्रा. मधू जाधव, तृप्ती बोंते हे उपस्थित होते.  या महोत्सवात  लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका, शास्त्रीय गायन, वादन,  वक्तृत्व आदी बाबींचा समावेश होता. त्यातून जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला. 



वक्तृत्व स्पर्धेत स्मृति धूत, बासरी वादनात सुमित वासनकर तर गिटार वादनात मंदार चतरकर हे स्पर्धक विजेते ठरले. या आयोजनासाठी क्रीडा अधिकारी दिनकर उजळे, कक्ष अधिकारी मनिषा ठाकरे, प्रशांत खापरकर, राजू उगवेकर, अजिंक्य धवडे, विक्रम काळे तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या