- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: विदर्भाच्या कलाक्षेत्रात विविधांगी गाजणारे, विदर्भाचे चित्रमहर्षी डॅडी देशमुख यांच्या जयंती निमीत्ताने आयोजित कार्यक्रमाचे नियोजन करण्यास्तव स्व.डॅडी देशमुख स्मृति लघुचित्रपट फिल्म महोत्सव समितीची सभा माजी आमदार प्रा तुकाराम बिडकर यांच्या अध्यक्षतेत हॉटेल सेंटर प्लाझा येथे झाली.
कोविड - १९ च्या प्रादुर्भाव व कोरोना महामारी लक्षात घेता स्व.डॅडी देशमुख स्मृति लघुचित्रपट फिल्म आयोजन समिती तर्फे जयंती कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचा मानस आयोजन समितीकडुन व्यक्त करण्यात आला आहे.
प्रसंगी नियोजित सभेचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर , प्रमुख अतिथी म्हणून मधू जाधव, प्रशांत देशमुख, डॉ किशोर देशमुख, अनुराग मिश्र, कृष्णा देशमुख प्रा.सदाशिव शेळके, प्रा.श्रीराम पालकर, प्रा.अशोक रहाटे, प्रा.दिलीप चव्हाण, प्रा. प्रफुल्ल देशमुख, प्रा.अशोक भराड, प्रा.राजदत्त मानकर, प्रा.दीपक गोल्डे , डॉ. प्रभाकर मोहे, प्रा. कैलास देवबाले, बबलू तायडे प्रामुख्याने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा