Shivsena: महत्वाचा निर्णय: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठींबा

भाजप विरोधात व कृषी कायद्यां विरोधात लढण्यासाठी अकाली दलाने शिवसेनेची मदत घेतली आहे.




भारतीय अलंकार

मुंबई: केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष तथा खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. आज वर्षा निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये शेतकरी आंदोलना संदर्भात चर्चाही झाली. या भेटीनंतर शिवसेनेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला.




शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेनं पाठिंबा दिला असून, दिल्लीच्या समन्वय बैठकीतही शिवसेना सहभागी होणार आहे, अशी माहिती अकाली दलाचे खासदार चंदू माजरा यांनी प्रसार माध्यमाना दिली आहे. तसेच शरद पवार यांचीही आम्ही भेट घेणार असून, आज जर भेट झाली नाही तर दिल्लीत सर्व स्थानिक राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करणार असून अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंह बादल या बैठकीचे नेतृत्व करतील, असेही त्यांनी सांगितले.






केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेने पाठोपाठ अकाली दल एनडीएतून बाहेर पडल्यानंतर भाजपला धक्का बसला होता. भाजप विरोधात व कृषी कायद्यां विरोधात लढण्यासाठी अकाली दलाने शिवसेनेची मदत घेतली आहे. आज यासाठीच अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.




टिप्पण्या