Fire:मूर्तिजापुरात एका घराला आग; ५ लाखाचे नुकसान




भारतीय अलंकार

मूर्तिजापूर : जुन्या शहरातील भरवस्तीत टांगा चौकात असलेल्या एका घराला दुपारी १ वाजताच्या दरम्यान आग लागून ५ लाखाचे नुकसान झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी घडली.



येथील टांगा चौकात राहणाऱ्या कस्तुरी चंद्रबली गुप्ता या मोल मजूरीचे काम करतात. घटनेच्या दिवशी त्या येथील बाजारात फुटाणे विकायला गेल्या असता दुपारी त्यांच्या घराला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती आहे. या आगीत त्यांचे संपूर्ण घर बेचिराख झाले असून घरातील धान्य व वस्तू, इलेक्ट्रॉनिक लाईटचे वायर, घरातील कपडे जळून खाक झाल्या आहेत. या आगीत त्यांचे किमान ५ लाखाचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे. त्यांना येथील नगर सेवक व्दारकाप्रसाद दुबे यांनी दोन हजार रुपयांची मदत केली.  



आगीला आटोक्यात आणण्यासाठी येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न केले. या महिलेला शासकीय मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

टिप्पण्या