- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार
अकोला : अमरावती शिक्षक मतदार संघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंग करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार महेश डवरे यांनी केली . देशपांडे यांच्या विरुद्ध डवरे यांनी तक्रार दाखल केली आहे.
आज होत असलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शहरातील आगरकर विद्यालयाच्या मतदान केंद्रावर सर्वच उमेदवारांनी आपले मतदान बुथ ठेवले. परंतू, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी मतदान केंद्रा बाहेरील बुथवर चक्क शिक्षक आघाडीचे पोस्टर लावल्याने वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार महेश डवरे यांनी आक्षेप घेत निवडणूक विभागाकडे देशपांडे विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा