corona update: अकोला: आज दिवसभरात ३५ पॉझिटीव्ह;१ मयत

               *कोरोना अलर्ट

*आज बुधवार दि. २३ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-४०३*  
*पॉझिटीव्ह-३५*
*निगेटीव्ह-३६८*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील उरळ ता. बाळापूर येथील तीन तर निपाना अकोला येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज खाजगी रुग्णालयातून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण तोष्णीवाल लेआऊट, अकोला येथील ६७ वर्षीय महिला असून ती दि. १३ डिसेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, युनिक हॉस्पीटल येथील दोन तर ओझोन हॉस्पीटल येथील एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले १६, अशा एकूण २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८२३३+१८५१+१७७=१०२६१*
*मयत-३१३*
*डिस्चार्ज-९१६४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७८४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या