corona update: आज ३१ पॉझिटीव्ह;१ मयत

           *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२३०*  
*पॉझिटीव्ह-३१*
*निगेटीव्ह-१९९*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व २३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड येथील चार, शास्त्री नगर, बाळापूर नाका, निखील किबे वाडा खोडके हॉस्पीटल, सिव्हील लाईन व खदान येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पुन्दा ता. अकोट, केडीया प्लॉट, कौलखेड, मोठी उमरी, दुर्गा चौक, सिंधी कॅम्प, कामा प्लॉट, मुर्तिजापूर, पोलिस स्टेशन सिटी कोतवाली, पोलिस स्टेशन रामदासपेठ, नजरिया हाऊस मुर्तिजापूर रोड, नानक नगर, जठारपेठ, पक्की खोली सिंधी कॅम्प, बार्शिटाकळी, सातव चौक व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण देशमुख फाईल, रामदास पेठ येथील ७९ वर्षीय पुरुष असून तो दि. २५ डिसेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८४२५+१८७६+१७७=१०४७८*
*मयत-३२०*
*डिस्चार्ज-९७३१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४२७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या