corona update: अकोला: आज १३ पॉझिटीव्ह रुग्ण

              *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. ३० डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२४३*  
*पॉझिटीव्ह-१३*
*निगेटीव्ह-२३०*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आश्रय नगर येथील तीन, आदर्श कॉलनी व बाभुळगाव येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित जीएमसी हॉस्टेल, कॉग्रेस नगर, मुंडगाव, टेलीग्राफ कॉलनी मुकूंद नगर, माधव नगर व दत्ता कॉलनी गोरक्षण रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८३९४+१८७४+१७७=१०४५५*
*मयत-३१९*
*डिस्चार्ज-९६२२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५०४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या