corona update: अकोला: आज पॉझिटीव्ह-३१; मयत १

             *कोरोना अलर्ट*


*आज मंगळवार दि. २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३९२*  
*पॉझिटीव्ह-३१*
*निगेटीव्ह-३६१*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व २२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील चार, अमानका नगर, जठारपेठ, जवाहर नगर, मोठी उमरी व जुने शहर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रिजेन्सी अपार्टमेंट, जगजीवन रामनगर, तेल्हारा, श्रद्धा रेसिडेन्सी, सहकार नगर, मलकापूर, बालाजी नगर, सिंधी कॉलनी, रतनलाल प्लॉट, बेलखेड, नुर नगर, रणपिसे नगर, बिर्ला रोड, रघुनंदन सोसायटी, शिवर, निमकर्दा व गायगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण संभाजी चौक, ता. तेल्हारा येथील ७१ वर्षीय पुरुष असून तो दि. १५ डिसेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८१९६+१८४३+१७७=१०२१६*
*मयत-३१२*
*डिस्चार्ज-९०८७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ८१७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या