corona update: अकोला: आज ४४ पॉझिटीव्ह; १ मयत

            *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. २० डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३३९*
*पॉझिटीव्ह- ४४*
*निगेटीव्ह-२९५*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३ महिला व ३१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील केशव नगर येथील पाच, राम नगर  येथील चार, रणपिसे नगर, कौलखेड, गौरक्षण रोड व खेतान नगर येथील प्रत्येकी तीन जण, सिध्दी कॅम्प व बिर्ला रोड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित मुर्तिजापूर, आरोग्य नगर, जीएमसी हॉस्टेल, मोठी उमरी, उरळ ता. बाळापूर, कृषि नगर, पत्रकार कॉलनी, आळशी प्लॉट,  तोष्णीवाल लेआऊट, तापडीया नगर, तेल्हारा, हरिश कॉलनी, छोटी उमरी, डोंगरगाव, आदर्श कॉलनी, पारस, अकोट, सिंधी कॅम्प व रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज  खाजगी हॉस्पिटल येथून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण दहिगाव ता. तेल्हारा येथील ६७ वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना १८ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८१५१+१८३८+१७७=१०१६६*
*मयत-३११*
*डिस्चार्ज-९०५०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-८०५*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या