corona update: अकोला: आज पॉझिटीव्ह-२३

                *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-४११*  
*पॉझिटीव्ह-२३*
*निगेटीव्ह-३८८*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील सहा, जूने राधाकिशन प्लॉट येथील तीन, खरप रोड व सोपीनाथ नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पारस, सिध्दी कॅम्प, आदर्श कॉलनी, मलकापूर, मोठी उमरी, लहरीया नगर, गोरक्षण रोड, व्हीएचबी कॉलनी, उरळ ता. बाळापूर व रामदास पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८०६७+१८२९+१७७=१००७३*
*मयत-३०६*
*डिस्चार्ज-९०२२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७४५*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या