corona update: अकोला: आज ३१ पॉझिटीव्ह;१ मयत

             *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. १६  डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-५४६*  
*पॉझिटीव्ह-३१*
*निगेटीव्ह-५१५*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३ महिला व १८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी, चोहट्टा बाजार व न्यु आळशी प्लॉट येथील प्रत्येकी तीन, राम नगर, दुर्गा चौक, गीता नगर, वर्धमान नगर व उरळ ता. बाळापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पिकेव्ही, दिनोडा, मुर्तिजापूर, कृषि नगर, अकोट, मलकापूर, न्यू तापडीया नगर, आरोग्य नगर, जठारपेठ, कौलखेड, लहान उमरी व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण उरळ ता. बाळापूर येथील ६० वर्षीय पुरुष असून तो दि. १४ डिसेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ७९६९+१८१७+१७७=९९६३*
*मयत-३०६*
*डिस्चार्ज-८९७७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६८०*

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या