Corona to Village:'कोरोना टू गाव' लघुपटाची निर्मितीःअकोट कला मंचचा उपक्रम




नीलिमा शिंगणे-जगड

अकोटः कोरोना या जागतिक आरोग्य संकटाच्या काळातील घटनेवर आधारीत ग्रामीण भागातील वास्तव मांडत सामाजात  जनजागृती तसेच शेतकरी कुंटुब व गावाचा सामाजिक संदेश देणारा 'कोरोना टू गाव' या लघु पटाची निर्मिती अकोट कला मंचने केली आहे. हा लघुचित्रपटाचे प्रदर्शन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे हस्ते आभासी (ऑनलाईन पध्दतीने) करण्यात आले. या अस्सल वऱ्हाडी लघुचित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या लाईव्ह प्रदर्शन कार्यक्रमाला तीन हजाराचे वर प्रेक्षकांची उपस्थिती होती. 



अकोट येथील कला मंचचे योगेश वाकोडे या युवकांने लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात बहुतांश शेतकऱ्यांचे मुलांनी यात अभिनय केला असून कोणताही खर्च व उत्पन्नाचे साधन म्हणून हा लघुचित्रपट बनविण्यात आला नाही. या जनजागृती लघुचित्रपट माध्यमातून काही शेतकरी कुटुंबातील वास्तव, शेतीचे महत्व हे कोरोना या महामारी संकटात उजळुन निघाले. नोकरी व लग्नाचे चिंताजनक परिस्थिती व काही मुलीचा शेतकरी नवरा बद्दलचा दृष्टिकोन पाहता शेतीचे महत्व, कोरोना पासुन प्रत्येकांचे आरोग्य,गावाचा विकास, गावात आपुसकी, काळजी स्नेहाचे नाते, शहर व गावातील हवा, पाणी बदल रेखाटला आहे.  



या लघुपटात ओघवते भाषेत संवाद बोलके आहेत. अकोट तालुक्यातील पिंप्री जैनपूर या गावात चित्रपटाचे शुटिंग करण्यात आले. शेतकरी कुंटुब व बंहुताश गावकरी मंडळींनी या चित्रपटात अभिनय केला आहे. समाजासाठी जनजागृती म्हणुन काम करणाऱ्या प्रत्येकाने स्वतः जवळली साधन सामुग्री वापरत योगदान दिले आहे.



अकोट कलामंच प्रस्तुत कोरोना- टु -गाव या लघुचित्रपटाचे निर्माता योगेश वाकोडे, दिगदर्शक विश्वास कुरवाडे, हरिष ढवळे, कथालेखक विजय शिंदे ,सहाय्यक संदीप ढोक, आदर्श अग्रवाल,रवी पवार, परिक्षीत बोचे, अमोल नगरे, मोहन परळकर, महेंन्द्र सोनोने, विशाल तट्टे, अतुल मानकर यांनी केले. तर अभिनय गीता भगत, भास्कर  भगत, भोजराज भगत, विजय शिंदे, अनंता भगत, ज्ञानेश्वर पखान, प्रशांत भगत, गौरव भगत, दीपक भगत, गोवर्धन बानेरकर, श्याम कोल्हे, नामदेव बानेरकर, वैभव भगत. अरविंद बानेरकर, लकी इंगळे यांनी साकारला आहे.



टिप्पण्या