Akola court: अकोला येथील न्याय सेवा सदनाचे शनिवारी ई- उदघाटन

                              संग्रहित छायाचित्र



भारतीय अलंकार

अकोला: वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे अर्थात न्याय सेवा सदन या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या नवीन इमारतीचे शनिवार १२ डिसेंबर रोजी सकाळी११ वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष ए.ए. सय्यद यांच्या हस्ते ई-उदघाटन (ऑनलाईन) होणार आहे. 


 


यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड.ए. हक, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव अभय मंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यन शिवराज खोब्रागडे राहतील. 




जिल्हा न्यायालय अकोलाच्या  https://districts.ecourts.gov.in/akola   या संकेतस्थळावर जाऊन https://youtube/rwxMGn9kl-A  

या लिंकवर क्लिक करुन उदघाटन सोहळ्यात इच्छुकांना सहभागी होता येईल. हा सोहळा जिल्हा व सत्र न्यायालय अकोला परिसर, स्टेशन रोड येथे होणार आहे, अशी माहिती अकोला वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. आनंद गोदे , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोलाचे सचिव स्वरुपकुमार बोस यांनी दिली आहे.


टिप्पण्या