VBA:'वंचित' च्या नगरसेविका‌ धनश्री देव यांचे निधन

धनत्रयोदशीची धामधूम सुरू असताना अचानक ही वार्ता समोर आली.


अकोला: वंचित बहुजन आघाडीच्या जठार पेठ परिसर प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका व अकोला बार असोसिएशनच्या सदस्य ‌ॲड. धनश्री निलेश देव  (अभ्यंकर) यांचे आज शुक्रवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्या ३८ वर्षाच्या होत्या. 


शरीरातील प्राणवायू स्तर कमी झाल्याने त्यांना ओझोन हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून त्यांचेवर शर्तीचे उपचार सुरू होते. त्या व्हेंटिलेटरवर होत्या. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यांना वाचविण्यात यश आले नाही.


शुक्रवारी  धनत्रयोदशीची धामधूम सुरू असताना अचानक धनश्री देव यांच्या निधनाची वार्ता समजली. मात्र,अनेकांचा या दुःखद वार्तावर प्रथम विश्वासच बसला नाही. परंतू, ही बाब दुर्दैवाने अकोलेकरांना स्वीकारावी लागली.  



सदैव हसतमुख,कुठलाही गर्व नसलेल्या,  फक्त एका फोन केला की, कोणालाही  भरभरून मदत त्या करत होत्या. मनमिळावू  स्वभावाच्या नगरसेविका धनश्री देव यांचे कोरोना मुळे अकाली गेल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.



टिप्पण्या