VBA: वंचितचा अकोट-तेल्हारा वीज मंडळ कार्यालयावर हल्लाबोल; लावले बेशरमचे झाड आणि बांधले तोरण

वीज चोरीचे समर्थन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ वीज मंडळाच्या कार्यालयावर बेशरम झाड आणि तोरण वंचित बहुजन आघाडीच्या अकोट व तेल्हारा येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लावले



तेल्हारा: वीज चोरी प्रकरणात पुराव्यासह तक्रार दिल्यावर देखील अवैध वीज चोरी विरुद्ध कार्यवाही करण्यास हिवरखेडचे अभियंता कुमार टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे वंचित बहूजन आघाडी तेल्हारा तालुक्यातील पदाधिकारी संतप्त झाले. वंचीत पदाधिकारी यांनी वीज मंडळाचे शाखा अभियंता कार्यालय तेल्हारा (हिवरखेड) येथे बेशरमचे तोरण लावून आज निषेध व्यक्त केला.




वीज चोरी करणाऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी न्यायाधीश सारखी भूमिका घेवून वीज मंडळ अभियंता कुमार यांनी मर्यादा पार केल्या आहेत. एका तरुण मुलीचा बळी गेला असताना आरोपी बाबत सहानुभूती दाखविण्या मागे त्यांना आर्थिक लाभ झाला असल्याचे सिद्ध करते. पुन्हा जर कुमार यांनी पक्षाबद्दल बेताल वक्तव्य केले तर त्याला वंचितच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल,याचे भान राखून या पुढे वक्तव्य करावे, असा इशारा देखील वंचित बहूजन आघाडी पदाधिकारी यांनी दिला आहे. 



कुमार हे वीज चोरांना सहकार्य करीत असून, आकोडे टाकून चोरी करणाऱ्यास आकोडे काढून पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करीत आहेत, असा आरोप देखील वंचितने केला आहे. 

या आंदोलनात अशोक दरोकार, प्रकाश खोब्रागडे, विकास पवार, सतीश मामनकार, रोशन दारोकार, आकाश जसनापुरे, प्रशांत गावत्रे, किशोर सरदार, नरेश बांगर,भाऊराव थोरात, मोहम्मद राजीक, लखन सोनटक्के, मो जमादार, मो राजीक, रवी गावंडे सहभागी झाले होते.



वीज चोरीला प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांचा बेशरम झाड लावून वंचितने अकोट येथे केला निषेध.

अकोट येथे कार्यकारी अभियंता उईके यांच्या निषेधार्थ वंचीतच्या पदाधिकारीनी वीज मंडळाचे कार्यालयात बेशरम झाड लावून निषेध व्यक्त केला.


शैलेश धांडे ,अक्षय तेलगोटे, राहुल वानखडे, भूषण घनबहाद्दूर, सोनू तेलगोटे, सुरज धांडे, यश तेलगोटे, पंकज शिवरकार, राहुल वानखडे यांचा यात सहभाग होता.



Latest Update

वंचितने अकोट तेल्हारा येथील वीज मंडळ कार्यालया वर बेशरम लावल्याने वीज मंडळ अधिकारी तळेगांव मध्ये दाखल झाले आहेत.


  

टिप्पण्या