Shivsena: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी; देशभरात वाहिली जात आहे आदरांजली

महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास विनम्र आदरांजली.




भारतीय अलंकार

मुंबई: नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य करणारे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त देशभरातून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली जात आहे. 


शिवतीर्थ

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, रश्मीताई ठाकरे, युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी आज शिवतीर्थ येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळाला विनम्र अभिवादन केले. 



अजित पवार यांनी वाहिली आदरांजली


"महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया," असं अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.





हिंदू जगला पाहिजे, हिंदू वाढला पाहिजे, हिंदू शिकला पाहिजे आपलं संपुर्ण आयुष्य हिंदू आणि हिंदुस्तानासाठी समर्पित करणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन,अश्या शब्दात राज्यातील तमाम शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देवेंद्र फडणवीस, यशोमती ठाकूर, रोहित पवार,अमित देशमुख यांच्यासह अनेक राजकीय पुढारी, चित्रपट सृष्टीतील नामवंतांनी समाज माध्यमाद्वारे बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. 







टिप्पण्या