Road accident:'वंचित'चे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचे अपघाती निधन; अपघातात ४ ठार,१ गंभीर

भिंगे हे आपला भाऊ आणि मित्रांसोबत औरंगाबादला निघाले होते


भारतीय अलंकार

लातूर: वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचे आज  अपघाती निधन झाले. गेवराई जवळ एका कंटेनरला त्यांच्या गाडीने धडक दिली. अपघातात सदाशिव भिंगे, व्यंकट चटके,  शंकर गुढधे व सुभाष भिंगे हे जागीच ठार झाले तर राम भिंगे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 



हा अपघात दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. भिंगे हे आपला भाऊ आणि मित्रांसोबत औरंगाबादला निघाले होते.गेवराई रस्त्यावर त्यांच्या गाडीच्या चालकाचा वाहना वरून ताबा सुटल्याने,समोरून येणाऱ्या टँकर वर गाडी आदळली. अपघातात चौघे जागीच ठार झाले तर १ गंभीर जखमी आहे. 



घटनेची माहिती मिळताच प्रा शिवराज बांगर आणि वंचितच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेवून, जखमींना दवाखान्यात उपचारार्थ नेण्यासाठी पोलिसांना मदत केली. 



टिप्पण्या