Online member: VBA ऑनलाईन सदस्य नोंदणी मोहीमेचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उदघाटन

घर तेथे वंचित युवा आघाडी कार्यकर्ता




भारतीय अलंकार

अकोला:  वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने "ऑनलाईन सदस्य नोंदणी" सुरू करण्यात आली.  "ऑनलाईन सदस्य नोंदणी गुगल फॉर्म" सार्वजनिक करीत युवा आघाडी सदस्य नोंदणी मोहीमेचे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले .



वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील युवा आघाडीची बांधणी सुरू करण्यात आली. २३ नोव्हेंबर पासून प्रदेश कार्यकारणी राज्यातील विविध जिल्ह्यातील दौरे प्रारंभ करणार आहेत.




"गाव तेथे शाखा आणि वार्ड तेथे बोर्ड" ही मोहीम राज्यभर उभारली जाणार असून घर तेथे वंचित युवा आघाडी कार्यकर्ता निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.



त्याअनुषंगाने  युवा आघाडीच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी गुगल फॉर्म" सार्वजनिक करीत युवा आघाडी सदस्य नोंदणी मोहीमेचे एड बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते यशवंत भवन अकोला येथे रीतसर उदघाटन करून नोंदणी खुली करण्यात आली. यावेळी युवा प्रदेश महासचिव  राजेंद्र पातोडे यांची उपस्थिती होती.




या नोंदणी मोहिमेत लाखो संख्येने युवा कार्यकर्त्यांनी नोंदणी करून युवा आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केले आहे.



टिप्पण्या