- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मतदार संघातील नागरिक व शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी विदर्भ माझा पार्टी आपले कार्यक्षम व विकासाची जाण असणारे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करीत आहे
अकोला: अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असून, १ डिसेंबर रोजी या अमरावती विभागाची शिक्षक निवडणूक होत आहे. या संदर्भात संपूर्ण विदर्भात विदर्भ विकासाचा मुद्दा घेत विदर्भ माझा पार्टी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार तिरपुडे व राष्ट्रीय सरचिटणीस मंगेश तेलंग यांच्या मार्गदर्शनात विकासात्मक कार्य अखंडपणे करीत आहे.
मतदार संघातील नागरिक व शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी विदर्भ माझा पार्टी आपले कार्यक्षम व विकासाची जाण असणारे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करीत आहे.या साठी अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार चाचपणी अभियान प्रारंभ झाले आहे.
ही निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यक्षम व विकासाची तळमळ असणाऱ्या उमेदवारांनी विदर्भ माझा पार्टी, सन्मित्र कॉम्प्लेक्स,पहिला माळा,महसूल कॉलनी, अकोला येथे २० नोव्हेंबर पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत संपर्क करण्याचे आवाहन विदर्भ माझा पार्टीचे अकोला जिल्हा अध्यक्ष अजाबराव ताले यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा