- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
"पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे"
भाजपातून राष्ट्रवादी पक्षात नुकतेच गेलेले जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना करोनाची लागण झाली आहे. आज सायंकाळी खडसे यांनी याबाबत स्वतः समाज माध्यमातून ही माहीती दिली.
करोनाचे निदान झाल्यानंतर एकनाथ खडसे उपचारांसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी दाखल होणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी. तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असे आवाहन खडसे यांनी केले आहे.
खडसे यांनी केले ट्विटरवर ट्विट
माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा