Crime news: बसस्थानक मागे आढळला महिलेचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह; परिसरात खळबळ

             Crime watch

हिवरखेड येथील घटना,मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही



हिवरखेड: येथील बस स्थानक मागे    मोबाईल टॉवरजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह फाशी घेतलेल्या स्थितीत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. महिलेचा मृतदेह मंगळवार 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी स्थानिक नागरिकांच्या दृष्टीस पडला. जागरूक नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 



प्रभारी ठाणेदार धिरज चव्हाण, उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, गोपाल दातीर, आकाश राठोड यांच्यासह हिवरखेड पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. 



पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्यास प्रयत्न सुरु केले आहेत. महिलेचा मृतदेह तेल्हारा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्याची कार्यवाही सुरू झाली. मृतक महिलेचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले.  मृतदेह जवळपास तीन दिवसांपासून लटकलेले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण मृतदेह च्या तोंडावर माश्या बसलेल्या आढळून आल्या.



मृतक महिलेच्या अंगावर लालसर रंगाची साडी परिधान केलेली असून महिलेच्या मृतदेहाजवळ एक मोबाईल पोलिसांना आढळला.  मोबाईल फोन द्वारा  संबंधितांशी पोलिसां मार्फत संपर्क साधणे सुरू आहे. महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या करून कुणी येथे मृतदेह लटकावून, आत्महत्याचा बनाव करून पसार झाला,या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत.





टिप्पण्या