Crime news: गीता नगरात ऐन दुपारी १२ वाजता चोरी; cctv मध्ये चोरटे कैद

Theft in Geeta Nagar at 12 noon;  Thief imprisoned in cctv



भारतीय अलंकार

अकोला: वाशिम बायपास मार्गावरील गीता नगर येथील नवकार ग्रीन रहिवासी संकुलात बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली. चोरटे चोरी करून पसार जरी झाले असले तरी परिसरात असलेल्या एका cctv मध्ये कैद झाले आहेत.



नवकार ग्रीन अपार्टमेंट मध्ये लखन शर्मा यांच्या घरी चोरी झाली असून, ऐन दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अंदाजे ५०  हजारांची चोरी झाल्याचे प्रथम दर्शनी शर्मा यांच्या निदर्शनात आले आहे.



घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी लगेच पोहचले.घटना स्थळाची पाहणी करून, पोलिसांनी तपास सुरू केला. 




परिसरातील cctv तपासले असता, एका cctv फुटेज मध्ये दोन्ही चोरटे, चोरी करून पसार होत असल्याचे दिसत आहे. दोन्ही चोरांनी काळे कपडे घातले असून, दोघांच्या जवळ बॅग्स आहेत. त्यांनी मोरणा नदीच्या दिशेने पळ काढला.आरोपी हे अंदाजे २० ते २२ वर्ष वयाचे असल्याचे दिसून येते. यावरून आरोपींचा शोध जुने शहर पोलीस घेत आहेत.यापूर्वी देखील या इमारतीत चोरीची घडली होती.



                  Cctv फु टे ज




 

टिप्पण्या