Coronaimpact: मिशनबिगीन अंतर्गत 31 डिसेंबरपर्यंत आदेश कायम;जिल्ह्यात 642 पॉझिटीव्ह रुग्ण घेताहेत उपचार

Order maintained till December 31 under Mission Begin; 642 positive patients are receiving treatment in the district




भारतीय अलंकार

अकोला: कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात  30 नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते.  महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हे आदेश कायम ठेवण्यात आले असून त्याची मुदत दि. 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापुर्वी प्रशासनाव्दारे लावण्यात आलेले निर्बंधामध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉकडाऊन उघडण्या बाबतचे आदेश कायम ठेवण्यात येत असल्याचे  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे.  हे आदेश दि.31 डिसेंबरचे मध्‍यरात्रीपर्यंत संपूर्ण अकोला  शहर व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.



192 अहवाल प्राप्त; 28 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज




आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 192 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 164 अहवाल निगेटीव्ह तर 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.


त्याच प्रमाणे काल (दि.29) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  ९४१६(७५१६+१७२३+१७७) झाली आहे. आज दिवसभरात  रुग्णालयात असलेल्या 14 रुग्णांना घरी सोडण्यात आले,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 54429 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 53055  फेरतपासणीचे 246 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1128 नमुने होते. आजपर्यंत एकूण 54145 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 46629 तर पॉझिटीव्ह अहवाल ९४१६(७५१६+१७२३+१७७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आज 28 पॉझिटिव्ह


आज सकाळी २८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला आणि १९ पुरुष आहेत.  त्यातील चार जण गड्डम प्लॉट येथील, दोघे सिव्हिल लाईन्स येथील तर उर्वरित तुकाराम चौक,  शिवाजी पार्क देशमुख फैल,  सांगवी खु., सोंजवी खु.,  जीएमसी, गायत्री नगर, कौल खेड,  गिताभवन शिवाजी पार्क जवळ,  नवलेवाडी अकोट,  शिवचरण पेठ, तेल्हारा,  डाबकी रोड, राजंदा ता. बार्शी टाकळी,  नंदखेड दहिहांडा ता. अकोट,  श्रद्धा लेआऊट,  आपातापा, रामनगर, व्यंकटेश नगर,  दहिगाव ता. तेल्हारा,  सुधीर कॉलनी, मुर्तिजापूर,  परिअम्मा कॉलनी खारोळेवाडी येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत.  तर आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.दरम्यान काल (दि.२९) रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह संख्येत करण्यात आला आहे.


14 जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 12, तर आयकॉन हॉस्पीटल येथून दोन,  अशा एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.


642 रुग्णांवर उपचार सुरु


आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ९४१६(७५१६+१७२३+१७७) आहे. त्यातील 293 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8481 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 642 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.



रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 110 चाचण्या, 15 पॉझिटिव्ह


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 110 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


आज दिवसभरात  आयएमए येथे 15 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एक पॉझिटीव्ह आले. 26 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या  चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. अकोला जीएमसी येथे 52 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर हेडगेवार प्रयोगशाळा येथे 17 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सहा जण पॉझिटीव्ह आले. आजपर्यंत 25238 चाचण्या झाल्या त्यात 1786 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.




टिप्पण्या