corona update:आज ३४पॉझिटीव्ह; १ मयत

              *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. २५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-४५८*  
*पॉझिटीव्ह-३४*
*निगेटीव्ह-४२४*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १७ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ येथील पाच जण, प्रभात किड्स येथील तीन जण, कौलखेड, कुंभारी, अमनखा प्लॉट व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित लोहगड ता. बार्शिटाकळी, धाबा ता. बार्शिटाकळी, तेल्हारा, पातूर, अकोट रोड, हिंगणा रोड, विद्युत नगर, रिधोरा ता.बाळापूर, पत्रकार कॉलनी, खिरपूरी, लोहारा ता. बाळापूर, बंबर्डा ता. अकोट, मलकापूर रोड, दुर्गा चौक, बाळापूर, गोरक्षण रोड, किनखेडपुर्णा ता. अकोट व मोठी उमरी  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण पंचशील नगर, सिव्हील लाईन येथील ७० वर्षीय पुरुष असून तो दि. १८ नोव्हेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


* सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-७३१०+१६८५+१७७=९१७२*
*मयत-२८९*
*डिस्चार्ज- ८३२९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ५५४*

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या