Akola crime:राष्ट्रीय महामार्गावर संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह; घातपाताची शक्यता

मृतक हा हेन्डज येथील धाब्यावर काम करीत होता





भारतीय अलंकार

अकोला: मूर्तिजापूर कंझारा टी पॉईंट जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या कडेला आज गुरूवार १९ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मुर्तिजापूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. इसमाचा मृतदेह श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उप जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. 





मृतक हा हेन्डज येथील सतनाम सिंग यांच्या धाब्यावर काम करीत असल्याचे कळले असून त्याचे नाव अशोक मिलके आहे,अशी ओळख पटली. तो अमरावती जिल्ह्यातील शदातपुर (वलगाव) जवळचा रहिवासी आहे,अशी माहिती सतनाम सिंग यांनी पोलिसांना दिली. 



१५०० रूपये मजुरी घेऊन अमरावती येथे बहिणीला भेटला जातो, असे सांगून मृतक अशोक मिलके हा अमरावती गेला होता. परंतू, आज कंझरा टी पॉईंटवर संशयास्पद स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे, त्यामुळे घटपाताचा संशय बळावला आहे. 


घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहचले. वंदे मातरम आपत्कालीन पथका मार्फत मृतदेह उप जिल्हा  सामान्य रुग्णालय येथे उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आला. ही हत्या की आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत.


टिप्पण्या