Akola crime: पुरुषोत्तम तायडे यांना उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

डॉक्टर तायडे यांना तूर्तास दिलासा

                             संग्रहित छायाचित्र




भारतीय अलंकार

अकोला: तीन आठवड्यापूर्वी वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना शहरात घडली होती. रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या विकलांग युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम तायडे यांच्या विरुध्द रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आज उच्च न्यायालयात आरोपी डॉक्टर तायडे यांच्या जमीन अर्जावर सुनावणी होवून, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयात आरोपी तायडे यांची बाजू  ऍड संग्राम शिरपूरकर,ऍड धर्माधिकारी, ऍड मुन्ना खान, ऍड.प्रवीण कडाळे  यांनी मांडली.



दरम्यान, डॉ पुरूषोत्तम तायडे यांनी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र,न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला होता. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्यांची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली होती. 



घटनेची हकीकत अशी की, खामगाव मधील एका गावात राहणारी मुलगी दोन वर्षांपासून पोटात दुखत असल्याने आपल्या आई आणि भावा सोबत अकोल्यातील नामांकित डॉक्टरकडे उपचारासाठी आली होती. डॉक्टरने तिची सोनोग्राफी करण्यासाठी तिला आपल्या कॅबिन मध्ये बोलावून,तपासणी करण्याचा बहाण्याने तिला झोपवले. पीडितेचा आईला व भावाला शंका आल्याने त्यांनी हा डॉक्टर आत काय करतो आहे, हे पाहण्याच्या प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरने पीडित मुलीच्या आई व भावाला कॅबिन बाहेर काढले. पीडीते सोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला असता, पीडितेने या डॉक्टरच्या कानशिलात हाणली. दिव्यांग असलेल्या या मुलीने आपली कशीबशी सुटका करून घेत कॅबिन बाहेर आली. पीडितेने कॅबिन मध्ये घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. हा प्रकार ऐकून संतापलेल्या पीडितेच्या भावाने तात्काळ रामदास पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली होती.



रामदास पेठ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तक्रार नोंदवून घेतली. या प्रकरणी रात्री डॉक्टर पुरुषोत्तम तायडे यांना रामदास पेठ पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या विरोधात रामदास पेठ पोलीस स्टेशन मध्ये भां द वि कलम  354, 376 C (D) L, 377 असे गुन्हे पोलिसांनी दाखल केले. ही कारवाई रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आव्हाळे, पीएसआय नरेंद्र पद्मने, प्रशांत इंगळे, श्रीकांत पातोंड, विशाल चव्हाण यांनी केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.




 



टिप्पण्या