- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वन्यसृष्टी
आज जाणून घेवूया कोल्हा या प्राण्यांच्या विषयी रंजक माहिती
साधारणपणे सूर्यास्तानंतर तसेच पहाटे कोल्हेकुई ऐकू येते. एक कोल्हा ओरडू लागला की त्याला दुसरा–तिसरा कोल्हा साद देवू लागतो.
Jackal कोल्हा
आपल्या गावाकडे कोल्हे व कोल्हकुई काही नवीन नाही.आसपास राहून सहजपणे नजरेत न येणारा कावेबाज अतिशय लबाड अन चतुर निशाचर व मिश्राहारी कुत्रा कुळात मोडणार प्राणी आहे.
पूर्णपणे वाढलेल्या कोल्ह्याची उंची सुमारे ३७ ते ४२ सें.मी. व लांबी साधारणतः ६० ते ७५ सें.मी.असते. शेपूट २० ते २८ सें.मी. लांबीचे असून वजन साधारणतः ८ पासून १२ कि.ग्र. असते. पायाचा पंजा कुत्राप्रमाणे पण आकाराने लहान म्हणजे दोन इंच (पाच सेमी) इतका असतो.
रंगानी काळ्या पांढर्या मिश्रित व राखाडी आणि उभे कान, निमुळते तोंड व कानावर, खांद्यावर व पायावर फिक्कट पिवळा. पाठीवरील फर काळ्या, राखाडी आणि पांढर्या केसांच्या मिश्रणाने बनलेली असते. पाटाकडील भाग फिक्कट तपकिरी ते क्रीम रंग आहेत. काळ्या पांढर्या मिश्रित व राखाडी सरळ लांब झुपकेदार शेपटी. ऋतू नुसार रंगात थोडफार बदल संभवतो.
कोल्हा एकट्याने व कधीकधी कळपाने वावरतो. प्रामुख्याने मृत प्राण्यांचे शिळे कुजके मांस, फळे, उस, कोंबडी, तसेच लहान सहान हरीण देखील तो मारु शकतो. परंतू जास्त करुन तो अपली शिकार धूर्त पणाने साधतो. त्यात मोठे प्राणी मारण्याची ताकद नसल्याने कोल्हा हा वाघ, बिबट यांच्या शिकारीवर डोळा ठेवून असतो. बोर आवडीने खाणारा कोल्हा कधीकधी ऊस, टरबूज- खरबूज खाउन शेतात घुसून शेतीचे नुकसान पण करतात. कोल्ह्याचे आवडते खाद्य कोंबडी, बदके, तित्तर व तसेच खेकड्याच्या बिळात अपली शेपटी घालून खेकडे पकडण्यात तरबेज आहे.
खुरटे व खुल्या जंगलात, गवताळ प्रदेशात दगडी कपारींत किंवा जमीन उकरून खड्यात कोल्हे वास्तव्य करतात. साधारणपणे सूर्यास्तानंतर तसेच पहाटे कोल्हेकुई ऐकू येते. एक कोल्हा ओरडू लागला की त्याला दुसरा–तिसरा कोल्हा साद देवू लागतो. संध्याकाळी शिकारीला बाहेर पडतो तर पहाटे पहाटे निवारण्या साठी परत येतात.
कुत्रा या प्राण्यांच्या प्रमाणे मादी कोल्हे पण गर्भधारणे नंतर ६०-६२ दिवसानी पिल्लांना जन्म देतात.जन्मतः पिल्लांचे डोळे बंद असतात, तर १०-१२ दिवसात डोळे उघडतात. त्यानंतर त्यांना दात येण्यास सुरुवात होते. साधारण दोन आठवड्यांत पिल्ले मास खाण्यास सुरुवात करतात. तोपर्यंत मादी कोल्हे पिल्लांना खाच खळग्यांत लपवून ठेवतात. वर्षा दीड वर्षानंतर पिल्लांची पूर्ण वाढ होते.
-देवेंद्र तेलकर
वन्यजीव अभ्यास,
माजी.मा.वन्यजीव रक्षक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा