Shivaji college: संशोधनाच्या क्षेत्रामध्ये शिवाजी महाविद्यालयाची उत्तुंग भरारी

महाविद्यालयामध्ये एकूण १५ संशोधन केंद्रामधून एकूण ४० पीएच.डी. मार्गदर्शकां अंतर्गत १४८ संशोधक विद्यार्थी समाजोपयोगी संशोधन कार्य करित आहेत







अकोला: श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संचालित अकोला येथील श्री शिवाजी कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे सर्वात मोठे महाविद्यालय आहे . महाविद्यालयमध्ये ११ वी पासून पीएच.डी. पर्यंत ७ हजारचेवर विद्यार्थी प्रवेशित असून २५० वर शिक्षक , शिक्षकेत्तर , कर्मचारी वर्ग कार्यरत आहे . शैक्षणिक कार्यासोबत क्रीडा , सांस्कृतिक क्षेत्रातही सुध्दा या महाविद्यालयाने उत्तुंग भरारी घेतली आहे . या महाविद्यालयाला नॅक व्दारा मागील दोनदा ए ग्रेड मिळाला असून येत्या मार्च - एप्रिल २०२१ मध्ये होणाऱ्या नॅक ग्रेडेशनसाठी हे महाविद्यालय विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने सज्ज झाले आहे,अशी माहिती प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी दिली.



महाविद्यालयातील शैक्षणिक संशोधन उपलब्धी व सामाजिक योगदान संदर्भात १४ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भिसे बोलत होते.



महाविद्यालयामध्ये एकूण १५ संशोधन केंद्रामधून एकूण ४० पीएच.डी. मार्गदर्शकां अंतर्गत १४८ संशोधक विद्यार्थी समाजोपयोगी संशोधन कार्य करित आहेत . त्यासाठी देशभरातून वरिष्ठ साधन व्यक्तींव्दारे ( Resources persons ) संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिल्या जाते . गेल्या १० वर्षापासून नॅक व्दारा अ दर्जा मिळविण्यात संशोधनाचा महत्वाचा हातभार आहे . तसेच अविष्कार स्पर्धा , नवोपक्रम स्पर्धा तसेच संशोधनासाठी नियमित कार्यशाळा पार पाडल्या जातात . वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण ९९ शिक्षकांपैकी २८ शिक्षकांना आपल्या संशोधन आणि शैक्षणिक विकासातील योगदानामुळे प्रोफेसर म्हणून पदोन्नती मिळाली आहे . ९९ प्राध्यापकांपैकी ६० प्राध्यापक आचार्य ( पीएच.डी . ) पदवीप्राप्त आहेत . तर गेल्या ५ वर्षामध्ये ५० पेक्षा जास्त संशोधक विद्यार्थ्यांनी आचार्य ( पीएच.डी . ) पदवी संपादित केली आहे. 



संशोधनासाठी महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये ६० हजारापेक्षा जास्त ग्रंथ व पुस्तके तसेच एन.लिस्ट कन्सोर्टीया अंतर्गत संशोधन साहित्य उपलब्ध आहे . महाविद्यालयामध्ये एकूण ०६ दीर्घ शोधप्रबंध(Major Projects) आणि ०६  ( Minor Projects )  वर संशोधन कार्य सुरु आहे . तसेच महाविद्यालयाच्या स्वत : च्या निधीअंतर्गत एकूण १० संशोधन प्रकल्पावर संशोधन कार्य सुरु आहे . कला , मानव्यविद्या , वाणिज्य व होम सायन्स , लायब्रेरी सायन्स हया शाखेंअंतर्गत संशोधन करणाऱ्या संशोधनासाठी विद्याशाखेनिहाय स्वतंत्र रिसर्च लॅब व कॉम्पुटर्स लॅब्सची सुविधा उपलब्ध आहे . विज्ञान विषयातील संशोधनासाठी महविद्यालयामध्ये स्वतंत्र CIC असून एकूण १४ प्रयोगशाळा आहेत . 




महाविद्यालयाला १ Food processing of technology या विषयाअंतर्गत UGC कडून B.Voc . programme मंजूर करण्यात आला . त्याचप्रमाणे महाविद्यालयातील विविध विषयांचे बॅचलर ऑफ व्होकेशनल सायन्सचे एकूण १२ अभ्यासक्रम प्रस्तावित आहेत . महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण मिळावे हया उदात्त हेतूने महाविद्यालयामध्ये एकूण १४ विविध विषयांमध्ये करिअर Career Oriented Programs ( COP ) मध्ये प्रशिक्षण व संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध आहे . महाविद्यालयातील विविध विभाग आणि एनजीओ , सामाजिक संस्था यांच्यासोबत एकूण २५ पेक्षा सामजस्य करार ( MOU ) झाले असून १० पेक्षा जास्त सामजस्य करार प्रस्तावित आहेत . मेक इन इंडीया आणि डिजीटल इंडीया अंतर्गत विदयार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात संधी मिळावी म्हणून Artificial Intelligence ( AI ) आणि Data Science अंतर्गत IT Park आणि Commerce Entrepreneurship development सेल प्रस्तावित आहे . २०१६ ते २०२० मध्ये रसायनशास्त्र विभागातील एस..ओमनवार , डॉ.जी.व्ही कोरपे , आर.जी.बोरा , व्ही.एस.हिंगणे यांना ०१ तसेच डॉ.एम.मुजाहिद , डॉ.एस.पी.देशमुख , डॉ.एस.जी.भडांगे , डॉ.जी.व्ही.कोरपे यांना ०१ असे ०२ पेटंट मंजूर झाले असून ते २०१७ ला प्रकाशित झाले आहेत . 




कला व मानव्यविद्या शाखेमध्ये राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.जीवन पवार व इतिहास विभाग प्रमुख डॉ.एन.टी.वानखडे यांना राष्ट्रीय स्तरावरील Indian Council of Social Science Research ( ICSSR ) New Delhi अंतर्गत मेजर प्रोजेक्ट मंजूर झाले आहेत . जीओइन्फॉर्मेटीक्स विभाग आणि Indian Space and Research Organization ( ISRO ) अंतर्गत नुकताच सामंजस्य करार झाला आहे . ज्याअंतर्गत राष्ट्रीय संशोधनामध्ये महाविद्यालयाचे योगदान विस्तारणार आहे.





महाविद्यालयाव्दारे Arts , Social Scinece , Management & Science या विविध विद्याशाखेतील संशोधक ( Research Scholars ) व प्राध्यापकांना संशोधन लेख ( Research Papers ) प्रकाशनासाठी New Interdisciplinary National Research Journal प्रकाशित करण्यात येते . महाविद्यालयामध्ये एकूण १४ करिअर ओरिएंटेट कोर्सेसची सुविधा असून एकूण १० विविध विभागातील बी.व्होक , चे अभ्यासक्रम प्रस्तावित आहेत . महाविद्यालयामध्ये २०१६ ते २०२० हया कालखडांमध्ये १ आंतरराष्ट्रीय , ४ राष्ट्रीय , ०२ राज्यस्तरीय तसेच ०६ विभागीय स्तरावरील परिषदांचे आयोजन करण्यात आलेले आहे . महाविद्यालयातील विविध विषयांमध्ये नेटसेट परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग दरवर्षी आयोजित केले जातात , यामध्ये तज्ञ मार्गदर्शकांव्दारे मार्गदर्शन दिले जाते . २०१६ ते २०२० दरम्यान एकूण २२ विद्यार्थी नेट सेट विद्यार्थी उत्तीर्ण होवून यातील बहुतांश विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत . 



त्याचबरोबर Indian Council of Social Science Research ( ICSSR ) New Delhi अंतर्गत २०१६ ला अर्थशास्त्र विषयामध्ये पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी डॉ.उमेश घोडेस्वार यांना पोस्ट डॉक्टरल फेलोशिप मंजूर झाली . तसेच पुजा मानकर हयांना २०१७-१८ मध्ये सूक्ष्म जीवशास्त्र विषयामध्ये कनिष्ट संशोधन फेलोशिप मिळाली . संशोधनासाठी इंटरनेट सुविधा व्हावी म्हणून १०० एमपीपीएसचे एकूण ०८ कनेक्शनसोबतच लीज लाईनची सुविधा सुध्दा प्रत्येक विभागामध्ये आहे . सामाजिकदृष्टया उपयोगी असणाऱ्या संशोधन कार्यामध्ये महविद्यालयाचे कार्य व योगदान महत्वपूर्ण ठरत आहे .

टिप्पण्या