- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोल्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली.
Road blockade in Akola to protest Rahul Gandhi's arrest
उत्तरप्रदेश येथे अत्याचार पीडितेच्या भेटीसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी हे गेले असता त्यांना रस्त्यातच अडवून पोलिसांनी धक्काबुक्की केली.या घटनेचा अकोला काँग्रेसने निषेध केला.
आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वाशिम नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे ३० मिनिट झालेल्या या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
यावेळी आंदोलकांनी मोदी विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली. यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या आंदोलनात महापालिका विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, कपिल रावदेव ,हेमंत देशमुख, प्रदीप वाखरिया सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हे सुध्दा वाचा:
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा