pubgbanindia: तरुणाईचा आवडता पबजी आजपासून भारतातून हद्दपार!

भारतातील तरुणाईला अक्षरशः वेड लावणारा पबजी हा गेम भारतातून आजपासून हद्दपार होणार आहे. PUBG ने जाहीर केल्यानंतर समाज माध्यमातून pubg प्रेमींनी दुःख सागरात बुडाले असल्याच्या पोस्ट केल्या.तर अनेकांनी यावर विनोदी पोस्ट टाकल्या.




चीन आणि भारतीय सैन्यात लडाख मध्ये झालेल्या हल्ल्यात भारताचे अनेक जवान शहीद झाले होते. यामुळे चीन आणि भारतामध्ये सीमावादावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे देशभरात  चीन विरोध जनक्षोभ तयार झाला होता. चिनी वस्तू वर बहिष्कार टाकला गेला.लोक रस्त्यावर उतरले. त्यामुळे केंद्र सरकारने चीनच्या मोबाईल ऍप वर पण बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये पबजीचा देखील समावेश होता.



या निर्णयानूसार भारत सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये ११८ चिनी मोबाईल ऍप वर  बंदी घातली होती. या यादीत PUBG या गेम ऍपचा सुध्दा समावेश होता. यामध्ये PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite या दोन्हीचा समावेश होता.  पबजी मोबाईलला गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअर हटविण्यात आले होते.



मात्र, हा गेम ज्या युजर्सने आधीच मोबाईल मध्ये इन्स्टॉल केला होता, असे युजर्स आजपर्यंत हा गेम खेळू शकत होते. मात्र, आता पबजी मोबाईलने जाहीर केलं आहे की, हे ऍप आज  ३० ऑक्टोबर पासून भारतात पूर्णपणे काम करणे बंद करेल. 



“३० ऑक्टोबर २०२० पासून Tencent games कडून भारतात सर्व युजर्ससाठी PUBG mobile Nordic Map Livik आणि PUBG moble lite या दोन्ही ऍपसाठी सर्व सुविधा आणि ऍक्सेस बंद केले जातील.”, असे पबजी मोबाईलने आपल्या फेसबुक वॉलवर लिहुन,जाहीर केले.



पबजी मोबाईल ऍपच्या प्रकाशनाचे हक्क आधी टेन्सेंट गेम्सच्या जवळ होते. टेन्सेंट ही चिनी कंपनी होती. भारत सरकारच्या आदेशानंतर ब्ल्यू होल स्टुडिओने या कंपनीसोबत भारतात काम करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता पबजी मोबाईलचे प्रकाशनाचे हक्क पुन्हा पबजी कॉर्पोरेशनला मिळणार आहे. २ डिसेंबर पर्यंत हा गेम क्रॉफ्टन इंक सोबत जोडण्यात येईल,असे  पबजी कॉर्पोरेशनने म्हंटलेले आहे.







टिप्पण्या