Kanhaiyalal Agrawal: ज्येष्ठ पत्रकार प्रा.कन्हैयालाल अग्रवाल यांचे निधन

जिल्हा पत्रकार संघातर्फे दिला जाणारा स्व.आबाराव देशमुख स्मृती जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.



अकोला: जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार , समाज सेवी ऍड. प्रा.कन्हैयालाल अग्रवाल (९०) यांचे वृद्धापकाळाने आज  निधन झाले. त्यांच्या मागे पुत्र, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्य यात्रा त्यांच्या लाला लजपतराय हाउसिंग सोसायटीतील त्यांच्या निवास स्थानातून ११ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता निघणार आहे.


कन्हैयालाल अग्रवाल हे दैनिक तरुण भारत, लोकमतचे वार्ताहर राहिले होते. त्यांनी विविध विषयावर लिखाण केलेले आहे , ते अकोला जिल्हा पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य होते. त्यांना जिल्हा पत्रकार संघातर्फे दिला जाणारा स्व.आबाराव देशमुख स्मृती जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.


त्यांच्या निधनाबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मा.अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा , जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर , प्रा.मधू जाधव,संजय खांडेकर यांनी शोक व्यक्त केला आहे. 

टिप्पण्या