- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सामाजिक कार्यकर्ते मनिष हिवराळे यांनी परिसर स्वच्छताचे महत्व पटवून देत निवारा स्वच्छतेसाठी खराटे व साफ सफाई साहीत्य वाटप केले.
अकोला: शहर महानगरपालिका अंतर्गत दिनदयाल उपाध्याय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत आशाकिरण महिला विकास संस्था,अकोला द्वारा संचालित आशा बेघर निवारा केंद्र अकोटफैल येथे शनिवारी जागतिक बेघर दिन साजरा करण्यात आला.
बेघर निवारा स्थळी जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधुन बेघर निवासी सोबत संवाद कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे विधीवत उदघाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे तर्फे विजय बेदरकर तसेच सामाजिक कार्यकर्ते मनिष हिवराळे यांचे उपस्थितीत झाले.
कार्यक्रमाचे आयोजन अकोला शहर महानगरपालिका अंतर्गत दिनदयाल उपाध्याय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान शाखेचे शहर अभियान व्यवस्थापक संजय राजनकर यांचे मार्गदशनात करण्यात आले.
यावेळी विजय बेदरकर जिल्हा प्रकल्प अधिकारी यांनी आशा बेघर निवारा अकोला येथे राहत असलेल्या निवारा वासियां सोबत संवाद साधला व त्यासोबत कोविड-19 या आजारावर चर्चा करून घ्यावयाची काळजी, सामाजिक अंतर, नियमित वैयक्तिक स्वच्छता, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी बार्टी पुणे यांचे कडुन संविधान उद्येशिका व पार्टी प्रकाशनाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते मनिष हिवराळे यांनी परिसर स्वच्छताचे महत्व पटवून देत निवारा स्वच्छतेसाठी खराटे व साफ सफाई साहीत्य वाटप केले.
बेघर दिनाचे औचित्य साधुन निवारा ठिकाणी शोषखड्डा तयार करण्यात आला. तसेच परिसर स्वच्छतेमध्ये घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करण्यात आले.
जागतिक बेघर दिवसानिमित्त आशाकिरण महिला विकास संस्था अकोला दुर्गा भट यांनी स्थानिक पातळीवर बेघर झाल्याच्या लोकांच्या गरजाकडे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे हक्काच्या निवा-यासाठी फुटपाथवर जिवन व्यतीत करणा-या बेघरांना सन्मानाने जिवन जगता यावे म्हणुन नगर परिषद संचालनालयाने १० आक्टोबर रोजी जागतिक बेघर दिन साजरा करण्याचा उपक्रमा निमीत्ताने निवारा वासियांच्या समस्या यावेळी जाणून त्यांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी संस्था संचालिका यांनी दिले.
यावेळी संस्थेतर्फ फळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन उषा राऊत यांनी केले. आभार शंतनु भट यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते करिता निवारा व्यवस्थापन टीमचे काळजी वाहक अ. ब. बुंदेले, निवारा सुरक्षारक्षक संतोष ठाकुर व शुभम ठाकुर यांनी सहकार्य केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा