Crime News: अकोल्यातील मद्य सम्राटाचा प्रताप; नोकराचेचं केले अपहरण

रक्कम वसूल न झाल्याने पित्त खवळलेल्या मद्य सम्राटाच्या मुलाने आपल्या मॅनेजरच्या मदतीने, नोकराला बळजबरीने आपल्या महागड्या पांढऱ्या रंगाच्या कारने अपहरण केल्याची धक्कादायक बाब समोर आली.

                                 प्रतिकात्मक चित्र

अकोला :अकोल्यातील एका मद्य सम्राटाने त्याच्याच दुकानात काम करणाऱ्या एका नोकराचे सिने स्टाईल अपहरण करून, त्याच्याकडून बळजबरीने शेतीचा इसार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २ लाखाच्या आर्थिक व्यवहारासाठी हे प्रकरण घडल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.


अकोल्यातील एका मद्य सम्राटाने आपल्या मुलाला आणि मॅनेजरला, आपल्याच किरकोळ विक्री देशी दारूच्या दुकानात काम करणाऱ्या नोकराला ७ ऑक्टोबर २०२० च्या अंदाजे १ वाजता दरम्यान, अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या भागीरथ वाडी, येथे रहिवासी असलेल्या २ लाख रुपयांची थकीत मद्याची रक्कम वसूल करण्यासाठी पाठविले. परंतू, रक्कम वसूल न झाल्याने पित्त खवळलेल्या मद्य सम्राटाच्या मुलाने आपल्या मॅनेजरच्या मदतीने, नोकराला बळजबरीने आपल्या महागड्या पांढऱ्या रंगाच्या कारने अपहरण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मद्य सम्राटाच्या मॅनेजरच्या सांगण्यावरून अवैद्य पणे देशी दारूची विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या इसमांंना उधारीवर २ लाख रुपयांच्या देशी दारूच्या पेट्या देण्यात आल्या होत्या, परंतु उधारीवर देण्यात आलेल्या दारूची रक्कम वसूल करण्यात उशीर झाल्याने, मॅनेजरने हात वर करून मद्य सम्राटाला उधारीवर विक्री केलेल्या दारूची रक्कम दुकानात काम करणाऱ्या नोकरानेच हडप केल्याचे दर्शविले. 


त्यावरून मद्य सम्राटाच्या मुलाने आणि मॅनेजरने भागीरथ वाडीत राहणाऱ्या नोकराला नोकराच्या घरी जाऊन, मद्य सम्राटाच्या मुलाने बायपास चौक स्थित एका देशी दारूच्या दुकानासमोरील रोडवरून, महामार्ग, पोलीस मुख्यालय, दक्षता नगर चौक, शहिद स्मारक चौक, नेहरू पार्क चौक, सिव्हिल लाईन चौक मार्गे आपल्या एका देशी दारू दुकानात नेऊन मारहाण केली. त्यानंतर मद्य सम्राटाच्या मुलाने त्या नोकराला आपल्या कार्यालयात नेऊन त्याठिकाणी मारहाण केल्याची सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजले आहे. 


त्यानंतर मद्य सम्राटाच्या मुलाने आणि मॅनेजरने पीडित नोकराला त्याच्याच फोनवरून, त्याच्या मुलाला फोन लावून नोकराच बँक पासबुक आणि आधार कार्ड आणायला सांगितले. त्यावरून पीडित नोकराचा मुलगा हा पासबुक आणि आधार कार्ड घेऊन, मुलाने पीडित नोकर (वडील) यांना फोन लावला असता, मद्य सम्राटाचा मॅनेजर पीडित नोकराचा मोबाईल घेऊन आला आणि नोकराच्या मुलाला तुझ्या वडिलांनी फोन चार्जिंग साठी लावला आहे, आणि ते बाहेर कामानिमित्त गेले असल्याचे सांगत, बँक पासबुक आणि आधार कार्ड माझ्याकडे देऊन टाक असे म्हणून आधार कार्ड आणि पासबुक मॅनेजरने स्वतःकडे घेऊन मुलाला निघून जाण्यास सांगितले.


त्यानंतर पिडीत नोकराला रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या एका ऑफिसमध्ये नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे. त्यानंतर गड्डम प्लॉट येथील एका वकीलाच्या ऑफिस मध्ये नेऊन, पीडित नोकराचे पातूर तालुक्यातील मौजे तुलंगा येथील शेताची इसार पावती २ लाख रुपयांमध्ये केल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली आहे. त्यानंतर पीडित नोकराला ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत २ लाख रुपये परत आले नाही तर, तुझ्या शेताची खरेदी करून, शेत हडपून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. 


हा सर्व प्रकार घडल्यावर, मद्य सम्राटाच्या मुलाने आणि मॅनेजरने पीडित नोकराला चारचाकी गाडीत बसवून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून एका अज्ञात स्थळी नेऊन, त्याला विना अन्नपाणी डाबून ठेऊन, दुसऱ्या दिवसी ३ वाजता डोळ्यावर पट्टी बांधून जठारपेठ परिसरात सोडुन दिल्याची माहिती खुद्द पीडित नोकराने दिली आहे. 


आपली सुटका झाल्यावर घडल्या प्रकारची लेखी तक्रार घेऊन पोलीस स्टेशन जुने शहर येथे पीडित नोकर गेला असता,त्याने लिहून आणलेली तक्रार न घेता, साधी मारहाणीची तक्रार दाखल करून, ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेला प्रकार हा गंभीर असून, गुन्हा मात्र अगदी साधा दाखल केल्याने, जुने शहर पोलीस मद्य सम्राटाच्या मुलाला आणि मॅनेजरला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे,असा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. 


या प्रकरणाचा तपास पीडिताने सांगितल्या नुसार ,ज्या मार्गावरून त्याला अपहरण करून नेण्यात आले, त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज,आरोपी आणि पीडिताच्या मोबाईलचे लोकेशन आणि ज्याठिकाणी पीडिताने सांगितले, त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर सत्य परिस्थिती समोर आल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या