corona update: अकोला:आज १६ पॉझिटीव्ह; एका रुग्णाचा मृत्यू

                 *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि.२९ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१०२*  
*पॉझिटीव्ह-१६*
*निगेटीव्ह-८६*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  जठारपेठ येथील पाच, तर उर्वरित बाळापूर, राधाकिसन प्लॉट, एमव्ही हॉस्टेल, तेल्हारा, मंगरुळ कांबे, राजंदा, महाजनी प्लॉट, मुर्तिजापूर, पातूर, खडकी व तुकाराम चौक येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण राजंदा, बार्शीटाकळी येथील ६८ वर्षीय महिला असून ती दि. २७ ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६७२८+१४३६+१७७=८३४१*
*मयत-२७७*
*डिस्चार्ज- ७६७८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३८६*

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या