corona update: आज १५ पॉझिटीव्ह; कोरोनाग्रस्त २७वर्षीय युवकाचा मृत्यू

                *कोरोना अलर्ट*

*आज गुरूवार दि. २२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-७२*  
*पॉझिटीव्ह-१५*
*निगेटीव्ह-५७*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर व गणेश नगर येथील प्रत्येकी तीन जण,  तर उर्वरीत जैन मंदिर, रुख्मिणी नगर, जठारपेठ, मोठी उमरी, रामदासपेठ, बोरगांव मंजू, खांडला, शास्त्री नगर व बाळापूर येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात शिवर, अकोला  येथील २७ वर्षीय पुरुष असून तो दि. २० ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६६००+१३९६+१७०=८१६६*
*मयत-२६७*
*डिस्चार्ज- ७४१६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४८३* 

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या