BJP AKOLA: भाजपा पूर्व मंडळ, ओबीसी आघाडी, व्यापारी आघाडी तर्फे राबविले जनजागृती अभियान व दोन हजार मास्कचे वाटप

याप्रसंगी भाजपा पूर्व मंडळ व्यापारी आघाडी व ओबीसी मोर्चा महानगरच्या वतीने जनजागृतीचे विविध स्टिकरचे अनावरण करण्यात आले.

BJP East Board, OBC Front, Traders Front carried out public awareness campaign and distributed 2,000 masks.





अकोला: भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळ, ओबीसी मोर्चा अकोला महानगर, व व्यापारी आघाडी पूर्व मंडळाच्या वतीने भाजपा पूर्व मंडळात आज करोना संदर्भात जनजागृती मोहीम व दोन हजार मास्कचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार  रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले.




केंद्रीय मंत्री संजय धोत्रे,आ गोवर्धन शर्मा, भाजपा जिल्हाध्यक्ष व आ रणधीर सावरकर , महानगर अध्यक्ष  विजय अग्रवाल , महापौर अर्चना मसने, शहर सरचिटणीस डॉ विनोद बोर्डे,  संजय जीरापुरे,  संजय गोडा,  अक्षय गंगाखेडकर, उपमहापौर राजेंद्र गिरी, सभापती सतीश ढगे, ऍड सुभाष ठाकूर , डॉ किशोर मालोकार यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हाध्यक्ष व आ रणधीर सावरकर, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा अध्यक्ष  जयंत मसने, पूर्व मंडळ अध्यक्ष ऍड देवाशिष काकड व पूर्व मंडळ व्यापारी  आघाडी अध्यक्ष  केशव पोद्दार यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. 


याप्रसंगी भाजपा पूर्व मंडळ व्यापारी आघाडी व ओबीसी मोर्चा महानगरच्या वतीने जनजागृतीचे विविध स्टिकरचे अनावरण आ. सावरकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.स्टिकर हे  केशव पोद्दार यांच्या कल्पनेतून साकारले आहेत. हे स्टिकर्स प्रमुख रहदारीच्या ठिकाणी व व्यापारी वर्गास वाटप करण्यात आले.


आमदार सावरकर यांनी जठारपेठ येथील व्यापारी, भाजी विक्रेते, नागरिक यांना मास्क वापरण्याचे व फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले. तसेच केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून जनजागृती करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.



भाजपा पूर्व मंडळ, ओबीसी आघाडी, व्यापारी आघाडीच्या वतीने हा संपूर्ण आठवडा जनजागृती सप्ताह म्हणून पाळण्याचे व प्रत्येक बूथला कोरोना संदर्भात जनजागृती करून मास्क वाटप करण्याचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. याप्रसंगी भाजपा पदाधिकार्यानी आकर्षक फलक घेऊन घोषणा दिल्या व जनतेचे लक्ष वेधले व त्यांना जागरूक केले.


या कार्यक्रमास डॉ किशोर मालोकार, ऍड सुभाष ठाकूर, शहर सरचिटणीस  संजय गोडा,  अक्षय गंगाखेडकर, महिला आघाडी प्रभारी  अश्विनी हातवळणे,  सागर शेगोकार, युवा मोर्चा अध्यक्ष  उमेश गुजर, नगरसेवक  मिलिंद राऊत, अनिल नावकार,  संदीप गावंडे,  प्रशांत अवचार, राहुल देशमुख,  अनिल मुरूमकर,  विजय जयपिल्ले,  गीतांजली शेगोकार, सुनीता अग्रवाल, जान्हवी डोंगरे,  सारिका जयस्वाल, निकिता देशमुख, नीलिमा वोरा,  जसमितसिंग ओबेरॉय, ओबीसी मोर्चा सरचिटणीस  रामेश्वर वानखडे, संजय तिकांडे,  दिलीप भरणे,  रुपेश जयस्वाल, संतोष डोंगरे, संजय जोशी, तुषार कुंभार,  आकाश ठाकरे, अभिजित कडू, केशव हेडा, अक्षय जोशी, उज्वल बामनेट, रुपेश लोहकपुरे, भावेश सोलंकी, टोनी जयराज,  उमेश श्रीवास्तव, शीतल जैन, राजेश उपरिकर, तुषार सपकाळ, विक्रम बंने,  गणेश वडतकर, अमोल बोडखे व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, प्रामुख्याने उपस्थित होते.


जनजागृती पर कार्यक्रमाचे संचालन  रुपेश लोहकपुरे व आकाश ठाकरे यांनी केले.  आभार अभिजित कडू व केशव हेडा यांनी मानले.

टिप्पण्या