Agriculture bill: भाजप पारित तीन शेतकरी विरोधी कायद्यांना विरोधासाठी काँग्रेसचे रविवारी स्वाक्षरी अभियान

भाजपच्या केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांना काँग्रेसचा विरोध

Congress signs campaign on Sunday to oppose three anti-farmer laws passed by BJP




अकोला: अकोला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोरपे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, सिविल लाइन्स, अकोला येथे भाजपच्या केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे. 


याप्रसंगी प्रामुख्याने डॉक्टर सुभाष कोरपे , कोषाध्यक्ष, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी,  श्री. अमानकर, माजी जिल्हाधिकारी, हेमंत देशमुख, उपाध्यक्ष, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी आणि कपिल रावदेव, सरचिटणीस, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी उपस्थित राहतील. 


याप्रसंगी सर्व काँग्रेस प्रेमी जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून स्वाक्षरी अभियान यशस्वी करावे, असे आवाहन सुनील घावट पाटील, अध्यक्ष, अकोला तालुका काँग्रेस कमिटी यांनी केले आहे.





टिप्पण्या