Workers:इमारत बांधकाम कामगारांचा हल्ला बोल…

इमारत बांधकाम कामगारांचा हल्ला बोल…

*प्रलंबित मागण्यासाठी प्रशांत मेश्रामच्या नेतृत्वात लक्षवेधी आंदोलन 


*आंदोलन अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील तहसिल कार्यालय व उपविभागीय अधिकारी  यांचे कार्यालयावर शृंखलाबद्ध पध्दतीने निवेदने देऊन करण्यात आले.



अकोला: बिल्डिंग पेंटर, बांधकाम व अन्य असंघटित मजूर संघ आणि कामगार संघटनांनी आज सोमवार १४ सप्टेंबर रोजी  आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, गौरक्षण रोड,अकोला येथे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांच्या नेतृत्वात लक्षवेधी हल्ला बोल आंदोलन केले.



काय आहेत कामगारांच्या मागण्या


*मजुरांना कोविड १९ रिलीफ फंड अद्यापपर्यंत मिळाले नाही ते लवकरात लवकर मिळण्यात यावे. 


*२०११ पासुन नोंदणी झालेले कामगार सहा महिने झाले आहेत मात्र, अजूनही रिलीफ फंड मंडळा तर्फे देण्यास सुरु झाली नाही. त्यामुळे अकोला जिल्हयातील कामगार या मदती पासुन वंचीत राहीले आहेत. त्वरित फ़ंड मिळावा.


*मागील वर्षी शैक्षणीक अर्थ सहाय्य व इतर अर्ज लवकर निकाली काढुन कामगांराना लाभ मिळावा व आवास योजनेचे फार्म हे जिल्हा कार्यालयात लवकरात घेण्यात यावे.


*ऑनलाईन नोंदणी झालेल्या कामगारांना त्वरीत कार्यालया मार्फत  ओळखपत्र देण्यात यावे.  


अश्या विविध मागण्यांसाठी  निवडक पदाधिकारी कोविड 19 साठी शासनाच्या नियमांचे पालन करुन, मास्क वापरुन , समांतर अंतर ठेवुन या मागण्या मांडण्याकरीता जिल्हा कामगार आयुक्त कार्यालय,अकोला समोर मंडप टाकुन आज सोमवारी दुपारी १२ ते २ पर्यंत हजर राहुन मागण्याचे निवेदन देवुन कामगार प्रशासनाचे लक्ष वेधले. 


संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम,  अ.जमीर अ.जहिर, विनोद जपसरे, युवराज खडसे यांचे नेतृत्वाखाली असंघटीत मजुर संघ अकोला यांनी आंदोलन केले आहे. 


यावेळी अनिल वाघमारे, अब्दुल जमीर अ.जहिर, मनोज बाविस्कर, आत्माराम साठे, गणेश सावळे, सैय्यद मकसुद, युवराज खडसे, मनोज इंगळे व संघटनेचे विविध शाखा अध्यक्ष यांनी भेटी देऊन अभिप्राय नोंदविले. 


आजचे  आंदोलन अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील तहसिल कार्यालय व उपविभागीय अधिकारी  यांचे कार्यालयावर शृंखलाबद्ध पध्दतीने निवेदने देऊन करण्यात आले. मागण्याचा विचार लवकर झाला नाहीतर पुढे आंदोलन तिव्र करण्यात येईल, असे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

टिप्पण्या